जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । मल्टिस्टेट को ऑपरेटीव्हीसह नागरी सहकारी बॅँकांना आपले थकीत खाते अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला वर्ग करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली असल्याचे जिल्हा अर्बन को ऑप बॅक्स असोसिएसनने पत्राद्वारे कळवले आहे. जिल्हा अर्बन को बॅक असोसिएशनने रिझर्व्ह बँकेकडे ही मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे बँका व्यवसाय वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत करू शकतील. बँकांचे मुख्य कार्य हे ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे असे असते. बँकांना नफा मिळवण्यासाठी कर्ज देणे व कर्जाची वेळेत परतफेड होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असते. कर्ज वितरणानंतर काही कर्जखाती थकीत होतात व सदर खाते वसूल करण्यासाठी बँका विविध पद्धती अवलंबतात. वसुली प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँका थकीत खाती अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला वर्ग करू शकतात. या मागणीसाठी जिल्हा अर्बन को-ऑप बँक्स असोसिएशन अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष प्रवीण कुडे, जी. एम. अग्रवाल, आर. जे. पवार, संजय बिर्ला, विवेक पाटील यांनी याबाबत रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर हा निर्णय झाला.