जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा । येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगांव ग्रामीण सह तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध समस्यांच्या मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्याचा माल हा बोर्डावरील भावापेक्षा कमी दराने खरेदी करून व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. अगोदरच वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
व्यापारी हा परवाना धारक असावा. ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करावी. आदी मागण्यांसाठी प्रा.भाऊसाहेब सोनवणे, छोटू सरकार, चंद्रभान पवार, संजय बडगुजर, अशोक पाटील व राजेंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल,विरोधी पक्षनेते, कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.