चाळीसगाव राजमुद्रा दर्पण | शहरातील रस्ते शोधून देखील सापडत नाही कारण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने रस्त्याना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा बिकट परीस्थितीत नगरपरीषद रस्त्यांची दुरूस्ती करण्यास तयार नसल्यामुळे राजकीय व सामजिक संघटनांच्या वतीने रिक्षा चालकाना मणक्यांचे आजार जडल्याने आजारावर प्रथमोपचार व्हावा म्हणून सामाजिक संघटनांच्या वतीने दि ६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा चालकांना आकाशबामचे (आयोडेक्स) वाटप करण्यात आले.
शहरातील रस्ते दुरुस्त व्हावे तसेच गटारींच्या स्वच्छता व साथीच्या आजारावर औषधी फवारणी करण्यात यावी यासाठी रयत सेना,मेरा गाव मेरा तीर्थ,आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपरिषद हद्दीत सात दिवस आंदोलन पुकारले असून आंदोलनाचा आज तिसऱ्या दिवसी सामजिक संघटनांच्या वतीने रिक्षा चालकाना मणक्यांचे आजार जडल्याने आजारावर प्रथमोपचार व्हावा म्हणून सामाजिक संघटनांच्या वतीने दि ६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा चालकांना आकाशबामचे ( आयोडेक्स ) वाटप करण्यात आले.आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रा तुषार निकम,सचिन राणे,मेरा गाव मेरा तीर्थ प्रवर्तक विजय शर्मा,खुशाल पाटील,किशोर पाटील,ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना नासिक जिल्हा अध्यक्ष कल्पेश महाले,रयत सेनेचे दिपक देशमुख,प्रदीप मराठे,पापा पठाण ,शरद कुंभार, कल्पेश भोई यांच्यासह रिक्षा चालक सहभागी झाले होते.