(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) 22 मे हा “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना “आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत” (We are part of solution # for nature) ही असून जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन तसेच जैवविविधतेची माहिती जनमाणसात व्हावी यादृष्टीने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थानी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धेकांनी आपल्या प्रवेशिका ईमेलवर 22 मे, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावी. असे प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
असे आहे स्पर्धेचे स्वरूप
चित्रकला/स्केच/पेटिंग स्पर्धा - वयोगट पाचवी ते आठवी (A४ & A३ Size) विषय - माझी आई, माझी वसुंधरा (My Mother, My earth) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक 3 हजार रुपये द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 1 हजार रुपये. चित्र [email protected] या ईमेलवर पाठवावे.
पोस्टर स्पर्धा - वयोगट नववी ते बारावी (A४ & A३ Size) विषय - माझे आवडते प्राणी (पशु/ पक्षी) व कारणे (My favorite animal & why) (birds, animals) रक्कम प्रथम क्रमांक 3 हजार रुपये द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 1 हजार रुपये. पोस्टर [email protected] या ईमेलवर पाठवावे.
निबंध स्पर्धा - वयोगट पदवीधर व पदव्युत्तर, विषय- जैविक संसाधने हे कोविड -19 समाधान आहे का? (होय/ नाही) (Biological conservation os a solution towards pandemic of covid-19) (for & against) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक 4 हजार रुपये द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 1 हजार रुपये. निबंध [email protected] या ईमेलवर पाठवावा.
फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी स्पर्धा- वयोगट खुला गट (video Clips for 2-3 Minutes) विषय - वन्यप्राणी हालचाल (पोहतांना/धावतांना/पाणी पितांना/शिकार करतांना) (Wild animal action) (Swimming/ running/chasing/hunting) बक्षीसाची रक्कम प्रथम क्रमांक 7 हजार रुपये द्वितीय क्रमांक 5 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 3 हजार रुपये. फोटो [email protected] या ईमेलवर पाठवावे