जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिकेत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहे. भाजप बंडखोरांनी विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिके नंतर बंडखोर नगरसेवकांना कार्यवाहीची नोटीस विभागीय आयुक्तांनी बजावली होती, त्याला प्रतिउत्तर म्हणून बंडखोरांनी प्रभाग समिती निवडणुकी दरम्यान भाजप नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन केले म्हणून त्यानुसार विभागीय आयुक्तांनी भाजपच्या 27 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. यामुळे भाजप नगरसेवकांनी पुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पक्षादेश मानून देखील बंडखोरांनी केलेली राजकीय व कायदेशीर कोडी भाजप नगरसेवकांची झाली आहे. नेमकं कोणाच्या ऐकायचे ? अशी परिस्थिती भाजपा नगरसेवकांची झाली आहे.
या प्रकरणी अद्यापपर्यंत भाजपमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र आगामी काळात बंडखोर विरुद्ध भाजप असा कायदेशीर वाद जोर धरणार असल्याचे दिसून येते. माजी मंत्री गिरीश महाजन हेच याबाबत पुढे काय तो निर्णय घेतील भाजप देखील कायदेशीर अभ्यासकांची टीम उभी करण्याच्या तयारीत भाजप आहे. याबाबत कायदेशीर प्रतिउत्तर काय द्यायचे? याबाबत भाजप चाचपणी करीत आहे.
काय आहे प्रकरण जाणून घ्या ?
भाजपच्या 27 नगरसेवक यांनी महापौरांच्या निवडणुकीत भाजपच्या प्लीज झुगारून भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपने बंडखोरांनी विरोधात अपात्रतेची याचिका न्यायालयात दाखल केली होती. बंडखोर नगरसेवकांनी देखील जुलै महिन्यात झालेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दरम्यान भाजपच्या 30 नगरसेवकांचा गट तयार करून भाजपचे गटनेते पद दिलीप पोकळे यांना दिले होते. भाजपचे गटनेते म्हणून दिलीप पोकळे यांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना व्हीप काढून बंडखोरांनी दिलेला उमेदवार हेच अधिकृत असल्याचे सांगत मतदान करण्याचा व्हीप काढला होता भाजपच्या 27 नगरसेवकांनी व्हीप झुगारून भाजपने दिलेल्या उमेदवारांनाच मतदान केले होते. त्याविरोधात दिलीप पोकळे कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या 27 नगरसेवकां विरोधात अपात्रतेची याचिका विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती या प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अपात्रते च्या नोटिसा पाठवून सात दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.