जळगाव राजमुद्रा दर्पण | जून , जुलै तोरणाची दुसरी लाट नियंत्रणात येऊ लागली ऑक्टोबरपर्यंत ही लाट बर्यापैकी ओसरली असताना तिसरे लाटे साठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली म्हणून महापालिकेने चाचणी केंद्र व केअर सेंटर अद्याप ताब्यात ठेवले आहे. दुसरी कडे पालिकेच्या चार केंद्रांवर चाचण्या सुरू असून दररोज चारशे ते पाचशे चाचण्या केल्या जात आहे.
राज्यात व जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोना ची दुसरी लाट सुरू झाली आहे. रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा पहिल्याप्रमाणे कोविड केअर सेंटर रुग्णालय यांची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मे-जून पासुन कोरोना ची लाट ओसरल्यानंतर जुलै ,ऑगस्ट पर्यंत दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन पूर्ण संख्या दहाच्या आत आणि आता तर अगदी एक दोनच रुग्ण समोर येत आहे.
मात्र सोबतच जिल्ह्यातील चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. मे-जून महिन्यात दिवसाला पाच सात हजारावर जाऊ द्या आता मात्र दररोज हजार ही चाचण्या होत नाही शहर एकेकाळी कोरोना संसर्गाचे हॉस्पॉट बनले होते त्यामुळे शहरात आजही कोरोना संबंधी काळजी घेतली जात आहे. मनपाकडून इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ रेल्वे स्थानक शासकीय तंत्रनिकेतन आणि त्याठिकाणी चाचण्या केल्या जात आहे तसेच प्रवास करणारे गुन्ह्यातील आरोपी ज्यांना शिक्षा झाली ते गुन्हेगार आणि डॉक्टरांनी रेफर केलेले रुग्ण अशा लोकांच्या चाचण्या सुरू आहेत.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील वस्तीगृहाच्या इमारतीचा ताबा घेतला होता तंत्रनिकेतन सुरु असून कॉल सेंटर साठी ताब्यात इमारती तशाच सज्ज ठेवण्यात आल्या आहे.