जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिका जनतेला लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरवण्यास असक्षम असतानासुद्धा बाहुबली करवाढ करीत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी घेतला आहे मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने कर वाढवण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल देखील अभिषेक पाटील यांनी उपस्थित केला आहे करवाढी संदर्भात राष्ट्रवादी आक्रमक रित्या मनपा चा विरोध करणार असल्याचे अभिषेक पाटील यांनी राजमुद्रा शी बोलताना सांगितले आहे.
यासंदर्भात अभिषेक पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव करांना अतिरिक्त कर न भरण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव शहरात गेल्या पाच वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक अपघातांना जळगावकरांना सामोरे जावे लागले आहे अनेकांनी आपले पाल्य तसेच पालक देखील गमावले आहेत मात्र त्याची भरपाई अद्याप पर्यंत मनपाने केलेले नाहीत अथवा त्या भागातील रस्त्यांची दुरुस्ती देखील मनपाने केलेली नाही यामुळे जळगाव करांमध्ये संतप्त वातावरण आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे मात्र ठेकेदारांना पोचण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. वॉटर ग्रेस या स्वच्छतेचा मक्तेदार नेहमी काही ना काही कारणास्तव वादग्रस्त ठरला असताना मात्र त्याचे काम अद्याप पर्यंत शहरात सुरू आहे. अनेक वेळा मनपाच्या विरोधात न्यायालयात जाऊन मतदारांनी मनपाला अडचणीत आणण्याचे काम केले त्यांला काही ठराविक लोकप्रतिनिधींच्या दबावा खातर वॉटर ग्रेसला वेळोवेळी सवलत देण्यात येत आहे.
अनेक सुविधांचा अभाव असताना देखील मनपाने करवाढीचा हट्ट धरला आहे करवाढीला नागरिकांनी विरोध करणे गरजेचे आहे. कोरूना काळात आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना मात्र अधिक भार जळगाव कर नागरिकांवर टाकण्यात येत आहे.
डेंग्यूचे साथरोग पसरत आहे. ठिकाणी कचराकुंड्या मोठ्या प्रमाणात भरले आहे मात्र मनपा आपले शहर सुंदर शहर असा दावा करीत आहे. मात्र सत्य जळगावकर अनुभवत असल्याने मनपा विरोधात नागरिक त्रस्त झालेले आहे.