जामनेर राजमुद्रा दर्पण | केंद्र शासनाकडून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, घरगुती गँस सिलेंडरच्या दरात वाढ होतच असुन सर्वसामान्यांच्या जिवावर हे केंद्र सरकार उठले असुन त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काही एक देणघेण नाही. केंद्र शासन ज्या वेळेस विरोधी बाकावर होते.तेव्हा महागाई विरोधात घोषणाबाजी करत होते.परंतु हेच भाजपाचे सरकार केंद्रात आल्यापासुन घरगुती गँस,पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असुन २ दिवसांआड दरवाढ होतच आहे.या महागाईच्या आगीत सर्व सामान्य जनता अक्षरशः होरपळून निघत आहे. कोरोनाच्या महामारीचा जन सामान्यांच्या जगण्यावर इतका वाईट परिणाम झाला आहे आणि त्यात मुलभुत गरजा म्हणून सध्याच्या काळात वापरात येणाऱ्या घरगुती गँस,पेट्रोल,डिझेल सारख्या इंधनाची दररोज होत असणारी वाढ याचा निषेध म्हणून व तसेच सुड बुद्धीने उपमुख्यमंत्री अजित पवार व यांच्या बहिणीच्या घरावर आयकर विभागाकडून टाकण्यात आलेले छापे ह्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा देवुन निषेधार्थ निवेदन देण्यात आले.मोर्चात भगवान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपुत,अशोक चौधरी, किशोर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, डॉ.प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक,प्रल्हाद बोरसे,तालुका उपाध्यक्ष, संदीप हिवाळे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय, राजु नाईक,ज्योती पाटील, सुनिता सुर्यवंशी, प्रेमा बोदडे,रत्ना पाटील आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.