जामनेर राजमुद्रा दर्पण – जामनेर येथे बारावी इयत्तेत शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात गळफास लावून स्वतःआत्महत्या केली.तशी सुसाईड नोट या मुलीने लिहून ठेवली आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुमारी नम्रता पद्माकर खोडके (मूळ राहणार दत्त मंदिर नगारखाना भराडी ता.जामनेर) हल्ली मुक्काम जामनेर या १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या २० – वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर आत्महत्या केली.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. नम्रताचे वडील हे पेशाने डॉक्टर असुन स्थानिक डॉक्टर के.एम.जैन यांच्याकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात.तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळले. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून मयत यरूणीची आई वाकी रोडवर बांधकाम चालु असलेल्या घरावर पाणी मारायला गेल्या होत्या त्या वेळेला मुलीने ही कृत्य केले असल्याची माहिती मिळत आहे.जामनेर पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल नोंदविण्याचे काम चालु होते.