मुंबई राजमुद्र दर्पण । शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच आहे, त्यात काही शंका नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या बंदकडे देशाचं लक्ष, बंदला पाठिंबा नाही असं कोणी राजकीय विधानं कोणी करत असेल तर त्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत का, शेतकऱ्यांचे देणं लागतो का हा प्रश्न स्वत:ला विचारावा, बंद मोडून काढू, रस्त्यावर येऊन दाखवा असं आव्हान कोणी देऊ नये. मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं, थार जीपगाडीने चिरडलं, अशी कोणती गाडी मुंबईत, महाराष्ट्रात असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, बंद चांगला आहे, तिन्ही पक्ष ताकदीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. किरकोळ घटना घडतात, त्या जगभरात बंदमध्ये होत असतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.