पारोळा राजमुद्रा दर्पण । लखीमपुर घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेत्यानं कडून पारोळा बाजार पेठ बंद करण्यात आली, यावेळी आरोपीच्या अटकेची मागणी करण्यासाठी व मृत शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी व आदोंलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व महविकासआघडी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सर्व शेतकरी व शेतकरी संघटना व विविध संघटनांनी एकत्र येत लखीमपुर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि बंदचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी माजी पालकमंत्री डॉ.सतीशअण्णा पाटील, काँग्रेसचे ता.अध्यक्ष पिरनअप्पा अनुष्ठान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शेतकरी संघटना माजी अध्यक्ष चतुर भाऊसाहेब, जिजाबराव बाप्पु, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलतनाना काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेना ता.प्रमुख प्राध्यापक आर.बी.पाटीलसर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कपिल चौधरी, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अण्णा चौधरी, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर पाटील, प्राध्यापक बी एन पाटील, आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.