जळगाव राजमुद्रा दर्पण । जागतिक मानसिक स्वास्थ् दिनाचा मुहूर्त साधून कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जलगाव मीडटाऊन यांनी संयुक्तपणे मोबाईल व्यसन मुक्ती हेल्पलाईन क्रमांक लॉन्च केलं.
सविस्तर वृत्त अशी की, 10 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मानसिक स्वास्थ् दिन म्हणून साजरा केला जातो आणि सध्याच्या काळात किंवा कोवेड नंतरच्या काळात लोकांचे मानसिकता वर खूप वाईट परिणाम झाला आहे. आपण आपले शारीरिक स्वास्थ्य कडे लक्ष देतो पण मानसिक आरोग्यची जास्त काळजी करत नाही किंवा त्याच्या सोबत जुळलेल्या गाठीमुळे आपण ते लोकां सोबत शेअर करत नाही. सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेक मुळे आपल्या रोजचे दैनंदिनी दिनचर्या किंवा आपल्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरी पारिवारिक वातावरणत खूप कमतरता निर्माण झाली आहे. त्याचे मुळे सामाजिक व पारिवारिक बांधिलकी, एकामेकांशी समोर समोर बोलण्याचे अभाव मुळे आपसातला संपर्क कमी होत चालला आहे आणि मोबाईल हे मानसिक आजाराचा स्रोत ठरत आहे. ह्या गोष्टीचा आढावा घेतला इंडिया इन टॉलरन्स या पुस्तकाचे लेखक तारिक शेख यांनी आणि या संकल्पनेतून लॉन्च केला मोबाईल व्यसनमुक्ती दूरध्वनी क्रमांक आणि त्यांना प्रोत्साहन दिला कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड टाऊन ह्यांनी.
10 ऑक्टोबरला एका ऑनलाईन कार्यक्रमात संध्याकाळी साडेसात वाजता गुगल मिटच्य माध्यमातून ” मोबाईल व्यसनमुक्ती मदत क्रमांक” चा लॉन्चिंग अँग्लो उर्दू जुनियर कॉलेजची माजी शिक्षिका अमिना अब्दुल रौफ शेख यांच्या हस्ते पहिला कॉल करून, लोकार्पण करण्यात आला.
सदरचे कार्यक्रमात रोटरी क्लब जळगाव मीड टाऊन चे अध्यक्ष डॉक्टर विवेक वडजीकर, राष्ट्रीय मोटीवेशनल ट्रेनर प्रोफेसर सैयद अल्ताफ अली, महानगरपालिका वैदकीय अधिकारी डॉक्टर विकास पाटील आणि जळगाव सायकॉलॉजिकल कौन्सिलर असोसिएशन चे संस्थापक सदस्य डॉक्टर अपर्णा मकासरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
सर्वप्रथम अमिना शेख यांनी मोबाईलचे अतिवापरामुळे परिवारात एकमेकांसाठी वेळेचा अभाव व त्यामुळे निर्माण होणारी उणीव भरण्यात ह्या मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांक च्या सहकार्य होईल असं मत मांडले.
दूरध्वनी क्रमांक :७५०७६४९४८१ ई-मेल आयडी : [email protected]