रावेर राजमुद्रा दर्पण :- उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी संपाची हाक दिलेली आहे. या अनुषंगाने आज रावेरात येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाचे संभाजी बिग्रेट प्रहार जनशक्तीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले खरे पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
यावेळी रावेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार अरुण पाटील राष्ट्रवादी अध्यक्ष निळकंठ चौधरी शहराध्यक्ष महेमुद शेख कॉग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन शेवसेना अध्यक्ष योगराज पाटील संभाजी बिग्रेड विनोद चौधरी मोरेश्वर सुरवाड़े प्रहार जनशक्ती अविनाश पाटील मानसी पवार पंकज वाघ अनिल पाटील गयास काझी सोपान पाटील संतोष पाटील सावन मेढे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित
महाराष्ट्र बंद अल्पप्रतिसाद
यावेळी महाराष्ट्राबंदला रावेर शहरात अल्प प्रतिसाद मिळाला महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी रावेर फिरून दुकाने बंद करण्यासाठी रस्त्यावर उतले परंतु पदाधिकारी गेल्यावर दुकानदारांनी दुकाने उघडले यामुळे महाविकास आघाडीला शहरात फारसा प्रतिसाद मिळाला नाही.