जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहरात नवरात्रीनिमित्त दुर्गा मातेच्या भव्य रांगोळी चित्राचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. मुंबई येथील सुप्रसिद्ध चित्रकार व रांगोळीकार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स चे विद्यार्थी शैलेश कुलकर्णी तसेच त्यांचे सहकलाकार विद्यार्थी स्वाती महाजन, साक्षी तावडे, अश्विनी अहिरे, सारिका गिरासे, सीमा झवर, ऐश्वर्या सराफ, शुभांगी पाटील यांच्या सिद्ध हस्ते काढलेल्या अतिशय सुंदर अशा दुर्गा मातेच्या रांगोळी चित्राचे प्रदर्शन दिनांक 11 ते 15 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केलेले आहे.
प्रदर्शनात दुर्गामातेची भव्य रांगोळी व तसेच 3D रांगोळी सर्वांना पाहण्यास मिळणार आहे तसेच प्रदर्शनानंतर रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात अधिक माहिती प्रदर्शन स्थळी मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, मात्र कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन आयोजक रवींद्र जोशी यांनी केले आहे. प्रदर्शनाचा पत्ता रवींद्र जोशी, जोशी प्लाझा, प्लॉट नंबर 59, हौसिंग सोसायटी कोर्टा मागे, बोरसे इस्टेट शेजारी, सहयोग क्रिटिकल हॉस्पिटल च्या बाजूची गल्ली, जळगाव (मो. 9822535941) या ठिकाणी आयोजित केलेले आहे. प्रदर्शनाची वेळ दुपारी दोन ते रात्री साडेआठ पर्यंत आहे. तरी सर्वांनी या प्रदर्शनाचा सहकुटुंब लाभ घ्यावा.