जळगाव राजमृद्रा दर्पण । जळगाव शहर महापालिकेत सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला असून गट नेता निवडीवरून पुन्हा पालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सी खेच सुरू झाली आहे. शिवसेनेतून तीन नगरसेवक पुन्हा भाजपाकडे घर वापसी झाल्याने पालिकेतील सत्तांतराचे चित्र पालटणर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, भाजपाचे गटनेते म्हणून 33 नगरसेवकांनी पाठींबा दिला असल्याचे पत्र भगत बालानी यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी मनपाच्या महासभेत जोरदार खडाजंगी होणार असल्याचे दिसून आले आहे. सत्तांतराचा ससे मीरा पुन्हा शिवसेनेच्या मागे लागल्याचे बोले जात आहे. त्यातच आयाराम गयाराम मुळे दोन्ही पक्षाच्या राजकीय अडचणीत वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. महासभेत स्थायी समिती सभापती आणि समितीचे सदस्य यांची निवड घोषीत केली जाणार आहे. परंतु तात्पुर्वी गटनेते पदाबाबत घडामोडी सुरु झाल्याने विविध राजकीय चर्चेला उधान आले आहे. मनपाच्या महापौर उपमहापौर निवडणूकीच्या कालावधीत बंडखोरी करून 27 नगरसेवकांनी भाजपाच्या महापौर व उपमहापौर यांना मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. त्यावरून 27 नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेचे अपिल दाखल झाले आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. तसेच या बंडखोर नगरसेवकांनी बैठक घेतल्याचा बनाव करून गटनेता व उपगटनेता बदला बाबतचे पत्र महापौर यांना दिले. महापौरांनी प्रशासनाच्या माध्यमातून कार्यालयाकडे पाठविले आहे. परंतू ते ग्राहय धरू नये असे भगत बालाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान विभागीय आयुक्तांनी भाजपच्या 27 नगरसेवकांना अपात्र का करू नये अश्या आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बंडखोर नगरसेवकांची धावपळ सूरू झाली आहे.