जळगाव राजमुद्रा दर्पण । मनपातील अधिकृत गटनेते भगत बालाणी असताना पक्षातील काही बंडखोर नगरसेवकांना सोबत घेऊन बेकायदेशीर बैठका घेत मीच अधिकृत गट नेता असल्याचे खोटे दस्तावेज तयार करून नगरसेवक दिलीप पोकळे यांनी दर्शवायचा प्रयत्न केला आहे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत फसवून केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस राधेश्याम चौधरी यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील , नगरसेवक भगत बालाणी ,महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
याबाबत उद्या होणाऱ्या महासभेत सदर माहिती आयुक्त व महापौर यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती भाजप तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सध्यस्थीतीत बहुमत भाजपकडे असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात डॉ राधेश्याम चौधरी यांनी केला आहे.
भाजपची लढाई विश्वासघातकी आणि दृष्ट प्रवृत्ती विरोधात आहे, उद्याच्या महासभेत आयुक्त,महापौर आणि उपमहापौर यांनी कायद्यांचे कोणतेही उल्लंघन करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा ईशारा देखील यावेळी डॉ राधेशाम चौधरी यांनी दिला आहे.
भाजप आणि बंडखोरांमधील वादात एकामागून एक विषयांची भर पडत आहे. यामुळे उद्याची होणारी महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.