जळगाव राजमृद्रा दर्पण । महापालिकेच्या आजच्या झालेल्या महासभेत मनपाचे गटनेता भाजपाचा की शिवसेनेचा या विषयावरून दोन्ही पक्षातील नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाल्याने महासभा महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी तहकूब केली आहे. त्यामुळे अधिकृत गटनेता कोण हे अद्याप स्पष्ट होउ शकले नाही.
व्यसपीठावर महापौर जयश्री महाजन उपमहापौल कुलभूषण पाटील आयुक्त सतिश कुलकर्णी आदी उपस्थित होते. ऑनलाईन झालेल्या या महासभेत सभागृहात भाजपाचे नगर सेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले की, मनपाचे गटनेता भगत बालाणी असून त्यांच्या निवडीला विभागीय आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्वानचे मतदान देण्यात यावे अशी मागणी केली. तर नगरसेवीका ॲड सुचिता हाडा यांनी सांगितले की, शिवसेनेच्या गटनेता दिलीप पोकळे यांच्या निवडीला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाली नाही त्यामुळे ते गटनेता होउ शकत नाही. लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन गटनेता हा भाजपाचाच आहे असे सांगितले. सभागृहात गटनेता निवडीच्या विषयावरून सत्ताधारी व भाजपा नगरसेवकांनमध्ये जोरदार शब्बदिक चकमक होउन खडाजंगी झाल्याने गोंधळ उडालेला होता.त्यामुळे कोण नगरसेवक काय बोलत आहे हे समजु शकले नाही तेवढयात अचानक सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक विष्णू भंगाळे माजी महापौर नितीन लढढा सुनिल महाजन आले. त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
कैलास सोनवणे आणि भगत बालाणी यांनी महापौरांना निवडीसाठी मतदान देण्याचे आवाहन केले. अखेर महापौर जयश्री महाजन यांनी गटनेत्याच्या निवडीच्या विषयावरून महासभा तहकूब केली असल्याची घोषणा केली.