जामनेर राजमुद्रा दर्पण | तालुक्यातील माळपिंप्री येथील काही तरुण कापसाच्या गाडीवर कापुस भरण्याच्या कामासाठी गेले असता.जवळच्याच पाळधी गावात कापुस भरल्यानंतर वर असलेल्या विजेच्या ताराचा स्पर्श झाल्यावर एका तरूणाचा म्रुत्यु झाला तर २ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारनंतर घडली. जखमी झालेल्या २ जणांना जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना केल्याचे कळते.तालुक्यातील माळपिंप्री येथील विशाल नाना श्रीखंडे(वय२३) हा गावातील काही तरूण व मजुरांसोबत कापुस भरण्याच्या गाडीवर(एम.एच.१९-झेड-०८९०) रोजाने मजुरीसाठी गेलेला होता.नाचणखेडा रस्त्यावर परदेशी मंगल कार्यालयाजवळ कापसाच्या गाडीच्या वरच्या भागात असलेल्या विशाल श्रीखंडे, ज्ञानेश्वर भोजने व ज्ञानेश्वर काळे या तिघांना वरती असलेल्या विजेच्या ताराचा स्पर्श होवुन जोरात धक्का लागला. यात विशालचा जागीच म्रुत्यु झाला.तर ज्ञानेश्वर भोजने व ज्ञानेश्वर काळे हे २ जण जबर जखमी झाले.दोघांना प्राथमिक उपचार देवुन जळगाव जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले गेले. पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पो.हे.कॉ.अनिल राठोड,पो.हे.कॉ. प्रदीप चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून मयत युवकाला जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी रवाना केले. घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.या घटनेमुळे कापुस तसेच इतर मालाच्या गाड्या प्रमाणापेक्षा अधिक क्षमतेने भरल्या जात असल्याचे समोर येते. यावर संबधित विभागाकडुन कारवाई का केली जात नाही हा प्रश्न उपस्थित होतो.किंवा थातुरमातुर दंडात्मक कारवाई करून सोडुन दिल्या जाते.