सातारा राजमुद्रा दर्पण । दुचाकी चालवण्यावरुन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार उदयनराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जनतेला कामे पाहिजेत, कामे करायची नाहीत आणि मग ते याच्यावरून गेले, त्याच्यावरून गेले अशी टीका करायची. मी दुचाकीवरून जाईन किंवा शिटवर उभा राहून जाईन. मी लोळत जाईन नाहीतर गडगडत जाईन. याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल तर तुम्हीही असे करा, असे उदयनराजे भोसले म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी दुचाकीवरून फिरतो. मी कसे फिरावे हे मी ठरवेन. मी चालत फिरेन, रांगत फिरेन. कारण माझे गुडघे दुखतात. काही राज्यांत सुटका झाली की लोक लोटांगण घालत मंदीराला प्रदक्षिणा मारतात. याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल तर त्यांनीही असे करावे, कारण लोकशाही आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. आम्ही कोणतीही गोष्ट केली तरी करताना जनतेला कामे पाहिजेत. कामे करायचे नाहीत आणि मग नावं ठेवायची ह्याच्यावरून गेले त्याच्यावरून गेले. कामे केली असती तर लोकांनी नाव ठेवली नसती.
हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हान देऊन ते म्हणाले, आमची नियोजित कामे होती, असे सांगतात. पण, माझा फक्त एकच पूर्व नियोजित कार्यक्रम असतो. सर्वसामान्य आणि जनतेची सेवा करणे. आपली सर्वांची प्रगती व्हावी, देशाची प्रगती व्हावी, जेणे करून मला दुचाकीवरून पुन्हा चारचाकीवरून जाता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.