जळगाव राजमुद्रा दर्पण । शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असणारी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या राजकीय पटलावर होणाऱ्या घडामोडींमुळे अधिक चर्चेत आली आहे. नुकत्याच जिल्हा बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व पक्षीय पॅनल चे निर्माते दिग्दर्शक असणारे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विरोधीपक्षा अधिक घटक पक्ष डोकेदुखी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कॉग्रेसने जिल्हा बँक निवडणुकीत स्वबळाचा नारा देत आम्ही सर्व पक्षीय पॅनल मध्ये नसल्याचा घणाघात केला आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील भाजप सोबत निवडणूक लढवण्यास नाराजी व्यक्त केली आहे. या प्रक्रियेत जिल्हा बँक निवडणुकीचे सर्वपक्षीय प्रमुख असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अधिक राजकीय ताण घ्यावा लागणार आहे. अन्यथा स्वबळावर देखील लढण्याची तयारी सेना करू शकते.
काय आहे कॉग्रेसची भूमिका
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सर्वपक्षीय पॅनलमधून बाजूला होत ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जिल्हा काँग्रेसने जाहीर केला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या उपस्थितीत एका पत्र परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. शन नेमकी राजकीय परिस्थिती काय ? यासंदर्भातील माहिती दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे विनोद देशमुख व मनोज वाणी यांनी राष्ट्रवादीने भाजप सोबत जिल्हा बँकेची निवडणूक नाही लढवावी म्हणून सोशल मीडियावर पोष्ट व्हायरल केल्या आहे. लखीमपूर घटनेदरम्यान निरपराध शेतकऱ्यांना आपल्या वाहनाखाली चिरडणाऱ्या भाजप पक्षा सोबत निवडणूक का लढवावी ? याबाबत सवाल उपस्थित केले आहे. स्वतंत्र निवडणूक लढाई नक्कीच भरगोस यश राष्ट्रवादीला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
सर्व पक्षीय पॅनलची चर्चा सुरु असताना भाजपने देखील स्वबळाची तयारी केली असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरु झाल्या होत्या, भाजपने या साठी प्लॅन ‘बी’ म्हणून कोणत्या जागेवर कोणते उमेदवार उभे करायचे तसेच कोणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात यादी तयार केली होती. जिल्हा बँक आम्ही आमच्या ताब्यात घेणार असे देखील भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले होते. भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी याबाबत संकेत देखील दिले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटक पक्षांच्या भूमिकेबाबत आपली रणनीती अद्याप पर्यत जाहीर केलेली नाही. महाजन व पाटील हे दोघे सेना- भाजप नेते नेमका काय ? निर्णय घेतात याकडे राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागून आहे.