सोलापूर राजमुद्रा दर्पण । महाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते. तर दुसरीकडे आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी उद्धवसाहेब बिना लायसन्सचे ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर आणि थोरात प्रवाशी असा दाखला देत विरोधकांची खिल्ली उडवली.
“मला माहिती आहे, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागतं. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं काही चालू केलं की बिना लायसन्सचा ड्रायव्हर बसवून दिला. उद्धव ठाकरे ड्रायव्हार, अजित पवार कन्डक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की हा ड्रायव्हर अपघात करेल. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट व्होल्वो गाडी देण्यात आली. पण दोन वर्षामध्ये किती टेकड्या, पहाड आले. तरीही आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालत आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या टोलेबाजीमुळे सभेत चांगलीच खसखश पिकली.
तसेच पुढे बोलताना शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असे गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटले. त्यामुळे आता नारायण राणे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.