मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची मागील कित्येक दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्या मागेपुढे कोणी असो वा नसो, भाऊ म्हणून मी पाठीशी कायम उभा राहणार आहे. “बहीण एखाद्या ठिकाणी अस्वस्थ असेल तर ती भावाला बोलून दाखवते. पण पंकजा ताईंनी मला असं काही बोलून दाखवलं नाही. त्यांनी मला मेळाव्याला बोलावलं नाही तरी मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल. पण मेळाव्याला येणारच असे वक्तव्य केले आहे.
दसऱ्यानिमित्त पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीडमधील भगवान गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे मोठ्या जोशात नियोजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून मुंडे यांनी जनतेने मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केलेले आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी यावेळी दसरा मेळाव्याला कोणालाही विषेश अतिथी म्हणून बोलावलेले नाही. मागील वर्षी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रण दिलं होतं. यावेळी मात्र पंकजा मुंडे याच मुख्य अतिथी असतील.