बीड राजमुद्रा दर्पण । बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला उपस्थित असलेल्या हजारो लोकांना प्रीतम मुंडे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत महाविकास आघाडीवर टीकेचे आसूड ओढले. “तुम्ही उन्हात बसेलेले आहात. आम्ही सावलीत कसं बसावं, हे काही आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही,” असं प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.
राजकारणात आल्यानंतर काही लोक इस्टेट कमवातात. गाड्या घेतात. बंगले बांधतात. प्रॉपर्टी वाढवतात. पण आमच्या वडिलांनी जी संपत्ती जमा करुन ठेवली आहे, ती आज तुमच्या रुपाने अपस्थित आहे. ही संपत्ती कधी चोरी होत नाही. तिला कोणी खर्च करु शकत नाही. अशा या संपत्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे एकच मागणं मागितलं. मला सकारात्मक उर्जा देण्याचं मागणं केलं, असेदेखील प्रीतम मुंडे म्हणाल्या.
बोलण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहेत. मी एकटी सावलीत बसून भाषण करेल तर मी मुंडे यांचा वारसा चावलणारी आहे, असं वाटणार नाही. मला वाटलं होतं की मी स्टेजवर सावली राहावी म्हणून काहीतरी करायला हवं. पण नंतर लक्षात आलं की हा काही आघाडीच्या कार्यक्रमातील स्टेज नाही. हा समाजातील वंचितांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेला स्टेज आहे. मी तुमच्यासोबत उन्हात, दुष्काळात, संकटात आहे,” असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.
अतिवृष्टीमुळे मेळावा होईल की नाही ? किती मोठा होईल, ही लोकांच्या मनात शंका होती. लोकांनी हा उसळलेला जनसागर पाहा. हा भगवानबाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्काराचे प्रतिक आहे. नवरात्रीचा सण आहे. आपण देवीचे मायाळू सहनशील रुप पाहतो. पंकजा मुंडे मंत्री असताना तुम्ही हे मायाळू रुप पाहिलं. पण दुर्गाष्टमी झाली. जेव्हा समाजात अन्याय अत्याचार होतो. तेव्हा दुर्गादेवीचं आक्रमक रुपही पाहिलं, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.