यावल राजमुद्रा दर्पण । यावल तालुक्यातील बामणोद येथे बैलगाडीसहीत शेतमजूर विहिरीत पडल्याने शेतमजूर आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय-६५, मूळ रा.हातेड,ता. चोपडा ह.मु. बामणोद ता. यावल) असे मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की विश्वनाथ सोनवणे हे सुरेश तुकाराम भंगाळे यांच्या शेतात शेताच्या कामाच्या निमित्ताने बामणोद शिवारात १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बैलगाडीने गेले होते. दरम्यान रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले. यात एक बैल आणि विश्वनाथ सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास लक्षात आला. सुरेश तुकाराम भंगाळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर पाटील करीत आहे.