जळगाव राजमुद्रा दर्पण । विजयादशमीच्या दिवशी शमलीच्या पानाला भारतीय संस्कृती मध्ये मोलाचे महत्त्व असून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पान हे सोन म्हणून प्रत्येक व्यक्ती एकमेकांना आपण देत असतो, पण या दिवशी झाडांची कत्तल केली जाते व आरोग्य दाई झाड आपल्याला आरोग्या साठी फार मोठे योगदान देते म्हणुच हे वृक्ष संगोपन करण्याचा संकल्प भाजपा प्रदेश पर्यावरण पंधरवडा निमित्त दिनांक १५ ऑक्टोबर विजयादशमी (दसरा) च्या दिवशी या उपक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान जळगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे( राजु मामा) महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी शमी च्या वृक्षाचे पुजन मंत्रोपचार करून वृक्षारोपण करून दसराचे सीमोलंघन केले. या प्रसंगी राष्ट्रीय पर्यावरण समिती सदस्य राजूदादा नन्नवरे, पर्यावरण संरक्षक व पर्यावरण मित्र डॉ काबरा, जिल्हा सरचिटणीस डॉ राधेश्याम चौधरी, महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, नगसेविका दिपमाला काळे, शिंपी समाज अध्यक्ष राजेन्द्र सोनवणे, अन्ना पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रम चे आयोजन पर्यावरण पंधरवडा जिल्हा संयोजक मनोज भांडारकर यांनी केले. आ. सुरेश भोळे यांनी पर्यावरण व वृक्ष संवर्धन हे आपल्या सर्वांनं च्या आरोग्यसाठी फार महत्त्वाचे आहे सांगितले. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमी असलेले चेतन खैरनार, राजेंद्र सोनवणे, अश्फाक शेख प्रमोद वाणी, सुरेश सोनवणे यांनी वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प केला. या प्रसंगी मंडळ ४ चे अध्यक्ष केदार देशपांडे सह प्रसिद्धी प्रमुख धीरज वर्मा, अर्ध्यात्मिक आघाडी अध्यक्ष हेमंत जोशी, ललित लोकचंदाणी, विवेक जगताप, अश्विन गांधी, सुभाष भांडारकर, भूषण ब्रम्हनकर, चेतन तिवारी आदींची उपस्थिती होती.