जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकी संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आज शासकीय विश्राम गृहात पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गूलाबराव पाटील, माजी मंत्री सतिश आण्णा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, डी जी पाटील, भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन, माजी आमदार प्रा चंद्रकांत
सोनवणे, गूलाबराव देवकर, आ. शिरीष चौधरी, आ. किशोर पाटील आदी उपस्थित होते. या सर्वपक्षीय पॅनच्या बैठकीत बँकेची निवडणूक बिनविरोध विषयी चर्चा करण्यात आली, परंतू काँग्रेसने भाजपासोबत जाण्यास नकार दिल्याने या विषयावर ठोस निर्णय होऊ शकला नाही कारण काही दिवसा पूर्वी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार म्हणाले होते की, बँकेच्या निवडणूकीत भाजपासोबत काँग्रस लढणार नाही वेळ पडल्यास काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल असे जाहीर केले होते. त्यामुळे या वक्तव्यचे पडसाद या बैठकीत दिसून आले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस सोबत आहे. त्यांच्या माध्यमातून पॅनल झाल्यास निवडणूक लढविण्याची शक्यता काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजपा सोबत जाण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे. जिल्हयाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडणूक का बिनविरोध व्हावी याविषयी मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँक ही दगडी बँक म्हणून राज्यात प्रसिदध आहे. सहकारात शेतकऱ्यांचे प्रश्न चांगल्य पदध्तीने सोडविण्यासाठी या बँकेच नाव लौकीक आहे. सहकारात राजकारण नको असे माझे मत असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न आहे. परंतु अंतिम निर्णय प्रत्येक पक्षचे नेते चर्चा करून घेणार आहे.
काँग्रेसने पुन्हा घूमजाव केल्याने बँकेची निवडणूक काँग्रस स्वबळावर लढविणार असे दिसून आले. काँग्रेस जर मैदानात उतरली तर भाजपाला देखील संर्पूण तयार निशी रिंगणात उतरावे लागणार असल्याचे भवितव्य दिसून आले. बैठकीत या विषयी बरिच चर्चा रंगली परंतू सर्वपक्षांचे एक मत होत नसल्याचे दिसून आले. राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये शिवसेना एक महत्त्वाचा घटक आहे . त्यांचा मान म्हणुन पालकमंत्री गूलाबराव पाटील यांच्याकडे बघून आम्ही आजच्या बैठकीला आले असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त्त केली.