जळगाव राजमुद्रा दर्पण | मविप्रच्या वादातून दाखल गुन्ह्यातील भोईटे गटाच्या ९ जणांवर ‘मकोका’ लावल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. मविप्र प्रकरणात दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्याची गरज असताना परंतू या प्रकरणात फक्त ९ जणांना लावण्यात आला आहे आणि हे चुकीचे असल्याचा आक्षेप अॅड. विजय पाटील यांनी घेतला आहे.
अॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात 8 डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून माजी मंत्री गिरीश मागण्यांसह एकूण 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्या नंतर जळगाव जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती.
मविप्र काबीज करण्याच्या उद्देशाने निंभोरा पोलीस ठाण्यात त्यांनी माजी मंत्री आ.गिरीश महाजन, सुनील झंवर यांच्यासह २९ जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. नंतर हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून या गुन्ह्यात ९ संशयितांवर ‘मकोका’प्रमाणे कलम वाढविण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व आरोपींना मकोका लावावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अॅड.विजय भास्करराव पाटील यांनी केली आहे.
‘मविप्र’ संस्था काबीज करण्याच्या उद्दिष्टाने संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी अॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली, अशी फिर्याद अॅड.विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे या फिर्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला होता. कालांतराने हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
यांचा आहे कार्यवाहीत समावेश
या गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या नऊ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे.
मकोका म्हणजे काय ?
मकोकानुसार कारवाई केल्यानंतर संशयितांना जामीन मिळालेला असला तरी तो रद्द करून पोलिस अटक करू शकतात. या कारवाईनुसार पोलिसांना संशयितांची ३० दिवसांपर्यंत पोलिस कोठडी घेता येते. असे विधी तज्ञांचे मत आहे. या कारवाई बाबत आ.गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया देत आपल्यावर ‘मकोका’ लावण्याची तयारी सुरु असल्याची खळबळजनक प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर दिली होती या प्रक्रियेत नाव न घेता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर त्यांनी ताशेरे ओढले होते. मकोका लावण्या संदर्भातली कारवाई शेवटी अधोरेखित झाली आहे.