(कमलेश देवरे)
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | दिवसापासून राजकीय पटलावर दिसेनासे झालेले जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांची जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक जिल्हा बँकेत एन्ट्री झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. माजी खासदार ए. टी. पाटील यांचा जिल्हा बँकेत प्रवेश होतात सारे राजकीय पदाधिकारी अवाक झाल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांशी बोलताना माजी खासदार ए . टी. पाटील यांनी मी भाजपचा आहे. असे सांगितले. पुन्हा सक्रिय एन्ट्री केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे
सतत लागोपाठ दोन वेळा जळगाव लोकसभेतून विक्रमी मताधिक्याने निवडून येणारे जळगाव लोकसभेचे खासदार ए. टी नाना पाटील यांची 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी कापण्यात आली. यामध्ये त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी माझा छळ करून अन्याय केला आहे. असा जाहीर आरोप पारोळा येथे सभेत केला होता खडसे समर्थक असल्याने माझ्यावर अन्याय करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर वाच्यता केली होती मात्र जिल्हा बँकेत त्यांना थेट भाजपकडून जिल्हा बँकेत उमेदवारी देण्यात आली आहे.
जळगाव लोकसभेमध्ये लोकप्रिय असे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक विकास कार्य त्यांच्या कार्यकाळात पार पडली आहे. नागरिकांच्या समस्या थेट सोडवण्यासाठी त्यांनी जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात समोर खासदार कार्यालय उभारले मात्र ऐन वेळेस यांचे भाजप मधल्या अंतर्गत कुरघोड्यान मुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे केंद्रीय मंत्री पदाचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले, बदनाम कारक अशा पोस्ट व्हायरल करीत त्यांचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न भाजपा मधल्या अंतर्गत विरोधकांनी केला. यात पक्षातील नेतृत्वाचे राजकीय पाठबळ मिळाल्यामुळे अंतर्गत विरोधक यशस्वी ठरले असे भाजपमधील जाणकार सांगतात.
माजी खासदार ए. टी. पाटील जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक असून मागच्या संचालक मंडळाचे भाजपकडून ऑफिस मतदारसंघातून जिल्हा बँकेवर निवडून गेले होते आता इथे भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे अशी माहिती त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिली आहे मी भाजपा सक्रिय आहे. पक्षाचे काम करत असून पक्षापासून दुरावलेले नाही अशी प्रतिक्रिया पाटील यांनी मीडियाशी बोलतांना दिली आहे.
यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याला कळा लागली अनेक दिवसापासून ते राजकीय विजनवासात गेले की काय ? अशा चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगू लागल्या होत्या मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची झालेली राजकीय “एन्ट्री” ही आगामी राजकीय संघर्षाचे संकेत देणारी ठरली आहे.