मुंबई राजमुद्रा दर्पण । खोट्या केसेस आणि केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे टाकण्यात येणाऱ्या दबावापुढे कुणीही झुकणार नाही. महाविकास आघाडीतील तिनही पक्ष अशा कारवायांना सडेतोड उत्तर देतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. ईडीच्या नोटीसमुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. दोन वर्षांपूर्वी अशीच ईडीची नोटीस पवारांनी आली आणि राज्यात आमचं सरकार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या. माझ्या जावयावर आरोप केले. मी कोर्टात लढत आहे. त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? असा सवालही मलिक यांनी केलाय.
नरेंद्र मोदी स्वत:ला हिंदूंचे नेते म्हणून सांगतात. आता त्यात राज ठाकरे यात असतील तर चांगली गोष्ट आहे. नेते जनतेचे असतात. गर्व से कहो हम हिंदू है असं बोलायला त्यांनी सुरुवात केलीय. धर्माच्या राजकारणावर आम्ही राजकारण करत नाही, अशी टीका मलिक यांनी राज ठाकरेंवर केलीय. तसंच सर्वांना इदच्या शुभेच्छा दिल्या.
लेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्या एनसीबीच्या अधिकार्याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे, असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सापडलेल्या शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबीने काऊंसिलिंग केले अशा बातम्या चालवल्या जात असल्याचे नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याचा आपल्या शब्दात समाचार घेतला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानं राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पाटील यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी चंद्रकांत पाटील यांनी काही क्षण आपली जीभ घसरल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केलीय. त्याचबरोबर पवारांबद्दल आदर असल्याचंच पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय. ‘ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं मलिक म्हणाले.