जळगाव राजमुद्रा दर्पण | माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य माधुरी उत्तर दे यांनी जिल्हा बँक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानुसार आज अधिकाऱ्यांसमोर अरे सर सही करण्यासाठी गेलो असता आमच्याकडून थेट 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी निवडणूक अधिकाऱ्याने केली असल्याचा गौप्य स्फोट चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला निवडणूक निर्णय अधिकारी महा विकास आघाडीला मॅनेज असून त्यांच्या माध्यमातून भाजप उमेदवारांना टार्गेट केले जात असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी आज अत्तरदे यांनी केला आहे.
खासदार रक्षा खडसे तसेच माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज देखील बाद ठरवण्यात आला आहे. अगदी त्याच पद्धतीने महा विकास आघाडीला सहकार्य करण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी काम करत असल्याचे अत्तरदे यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. सगळ्यांच्या रीतसर सह्या घेत असतानाच आमची सही का घेतली गेली नाही अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यदर्शी सही करण्यासाठी मागणी केली. इतर उमेदवारांनी सही केली मग आम्हाला का करू दिली गेली नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रकरणी हायकोर्टात जाणार असल्याचा ईशारा चंद्रशेखर अत्तरदे यांनी माध्यमांसमोर दिला आहे.
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक धामधूम सुरू असताना भाजपचे उमेदवार असलेल्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे यांच्याकडून लाचेची मागणी होत असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा च्या वतीने भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कालच हरकतीच्या दिवसात माजी आमदार स्मिता वाघ तसेच रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. आणि त्यातच आज जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांना सही करण्यासाठी पन्नास हजाराची लाचेची मागणी करण्यात आली आहे. असा आरोप अत्तरदे दापत्य यांनी केला आहे.
दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज बाद होत असताना विकास आघाडीच्या एकूण तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. यामुळे भाजपाचे राजकीय अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसब लागणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभारली जात असल्याचे सांगितले जात आहे.