जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील टॉवर चौकात महापालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर संयुक्त कार्यवाही मोहीम राबवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी पूर्ण करून घराकडे निघालेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबला टॉवर चौक येथे अडविले असता मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या सोबत चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही तर थेट पोलीस ठाण्या पर्यत गेला आहे. महिला पोलीस कर्मचारी यांनी यावेळी उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतल्याने वाद शिगेला पोहचला शहर पोलिसात या वादा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र या प्रकरणात काही राजकीय व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान , महिला पोलीस कर्मचारी हसीना तडवी या जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून उस्मानिया पार्क येथील रहिवासी आहे. सामाजिक कार्यकर्ते नदीम मलिक यांच्या त्या पत्नी असून या पूर्वी निर्भया पथकात त्यांनी कर्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या मध्यस्ती ने वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.