जळगाव राजमुद्रा दर्पण । देशात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीचे सावट होते. अशा भल्या मोठ्या संकटाला तोंड देत देशाला पुढे नेताना पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी देशाला कोरोना महामारीच्या धोक्यातून कायम स्वरूपी मुक्त करण्यासाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा १०० कोटीचा मोठा टप्पा पार केल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे परिचरिकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी, महेश पाटील, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, राहुल मिस्त्री, सागर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.