जामनेर राजमुद्रा दर्पण :- पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.सागर गरुड यांची नुकतीच जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन गरूड यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना डॉ.सागर गरुड यांनी सांगितले की पाचोरा येथील रुग्णालयात शासनाच्या विविध योजनांचा आरोग्य विषयक लाभ रुग्णांना मिळत आहे.मोठ्या प्रमाणात उपचार व शस्त्रक्रिया तेथे मोफत होतात.यापुढे जिल्हाभरात शासकीय व खाजगी रुग्ण सेवेच्या माध्यमातून तसेच विविध आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन करून त्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच जामनेर,सोयगाव तालुक्यातील पंकज पाटील,शंतनू गरुड, संभाजी पाटील, वेदांत पाटील,जामनेर सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे, कार्याध्यक्ष निलेश साबळे आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.