धुळे राजमुद्रा दर्पण । क्रूझ पार्टी प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल करत माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जेष्ठनेते अनिल गोटे तपास अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचेच एक हत्यार असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. भाजपचे नेते रोज उठून याची चौकशी त्याची चौकशी संदर्भात खुलासे करत असतात. भाजपच्या कार्यालयातून ईडी कारवाई करणार हे ठरते का? असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला आहे.
रणवीर सिंग या पोलीस अधिकाऱ्यास देखील भाजपने वापरले. त्यांच्याकडून शंभर कोटींचा आरोप करण्यास सांगितला व त्यानंतर परमवीर सिंग यांना भाजपने कुठे लपवून ठेवल आहे. त्याचा खुलासा भाजपने करावा; असे देखील गोटे यांनी म्हटले आहे. तसेच तत्कालीन संचालकांना व मुख्यमंत्र्यांना पत्र मिळण्याआधी मीडियाला पत्रक कसे मिळाले? हा देखील प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला आहे.