जळगाव राजमुद्रा दर्पण । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब प्रदीप पवार यांची नियुक्तीचे आदेश दिलेले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा दि. २८ ऑक्टोबर गुरुवारी रोजी दुपारी दोन वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी राहतील. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर ,तसेच जिल्हा काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, माजी प्रदेश पदाधिकारी, विभागाचे अध्यक्ष व पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष अधिकारी सर्व तालुक्याचे ब्लॉक अध्यक्ष व तालुका शहर अध्यक्ष तसेच काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.