जामनेर राजमुद्रा दर्पण । जामनेर येथील गोंदेगाव (शेंदुर्णी) येथे विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज येथील विद्यार्थी यांच्यामार्फत कायदा जनजागृती शिबिर ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. तेजस्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.एस आर पाटील यांनी कायदा अंतर्गत तर ॲड अर्चना किरोते यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली. डॉ. भक्ती कुलकर्णी यांनी ॲसिड अटॅक मधील पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती, तर डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनी स्री पुरुष समानता या विषयी मार्गदर्शन केले. ॲड. ज्ञानेश्वर बोरसे आणि ॲड आशुतोष चंदेले यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला.
दोंडवडे येथे एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, तेजस्विनी पाटील, पूजा सांखला, संकेत राजपूत, सचिन पाटील गोविंदा जाधव यांनी रॅली काढत कायद्याची जनजागृती केली. दरम्यान गावातील सरपंच आणि ग्रामसेवक समवेत ग्रामस्थ मंडळी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला. ॲड कोमल काळे यांनी विधी सेवा प्राधिकरण विषयी तर ॲड आशुतोष चंदेले यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, व पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच ॲड. दिपाली सुरवाडे, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे, आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.