धुळे ग्रामीण राजमुद्रा दर्पण / दिवाळीसारखा आनंदाचा क्षण येत आहे पण हा आनंद शेतकरी राजाच्या नशिबात दिसत नाही. यावर्षी पीकपद्धती जोमात होती शेतकरी आनंदाच्या वातावरणात होता पण अस असतानाच त्यानंतर अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले मालाची टक्केवारी 100% यावरून तीस ते चाळीस टक्क्यांवर येऊन ठेपली. एवढ प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं या अति पावसामुळे झालं. असंच धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शेतकरी श्री बहादूरसिंग जोरसिंग पवार व मुलगा धनसिंग पवार यांनी आपल्या शेतात नाविन्याची कास धरत पारंपरिक कपाशी पिकापेक्षा काही वेगळं करू या महत्त्वाकांक्षेने तैवान जातीच्या पपईची 2000 रोपांची लागवड केली.पण सततच्या अतिपावसामुळे पपई पिकाला याचा मोठा फटका बसला. अति पावसामुळे फळधारणा कमी झाली. पिकाची सर्व पाने गळून गेल्यामुळे लागलेली फळ उन्हाच्या चटक्याने खराब झाले. प्रचंड प्रमाणात येणारे उत्पन्न अक्षरशा शून्य टक्क्यांवर येऊन ठेपले. वर्षभराची कमाई यामुळे या शेतकऱ्याची वाया गेली. या पिकासाठी 1 लाख रुपये खर्च केले पण ज्यावेळी मालाची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे व्यापार्याला बोलावून चेरी साठी पपई विकण्याचा निर्णय घेतला यावेळी अक्षरशः व्यापाऱ्याने सर्व पपईचे फक्त 2 हजार रुपये घडतील असे सांगत या शेतकऱ्यांची थट्टा केली. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे या शेतकऱ्याने संपूर्ण पपई पिकावर रोटावेटर फिरवून सर्व पीक जमीनदोस्त केले. शासनाने अतिपावसाने नुकसान झाल्यामुळे कोणतेही पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्याला अजून मदत मिळालेली नाही. तरी बहादूरसिंग पवार व धनसिंग पवार यांनी कपाशी व फळ लागवड पपई याची नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून लवकरात लवकर मिळावी अशी विनंती शासनाला केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार लवकर मदात जाहीर करेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.