जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहर महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली आहेत. ७५ वरून ८६ वर करण्यात आली आहे. राज्यातील वाढलेली लोकसंख्या आणि नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
महापालिकेत ३ लाखांपेक्षा अधिक आणि ६ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ७६ तर २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची संख्या १५६ व अधिकतम संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल, ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकतम संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल, अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या ४० व अधिक संख्या ७५ हून अधिक नसेल, ब वर्ग नगर परिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २५ व अधिक संख्या ३७ हून अधिक नसेल, क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या २० व अधिक संख्या २५ हून अधिक नसेल.
महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या १७ सदस्य व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. म्हणून नगरसेवकांची संख्या ७५ वरून ८६ वर करण्यात आलेली आहे.