मुंबई राजमुद्रा दर्पण। आज तुरुंगातून बाहेर येऊ शकतो आर्यन वकील मुकुल रोहतगी म्हणाले शाहरुखच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आर्यन खान साठी देशातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची मदत घेण्याचा शाहरुखचा निर्णय योग्य ठरला. कनिष्ठ न्यायालयाने दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनला गुरुवारी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र, संध्याकाळी निकाल आला, त्यामुळे आर्यनची सुटका होऊ शकली नाही. असे मानले जात आहे की कागदपत्र पूर्ण होताच आर्यन तुरुंगातून बाहेर येईल आणि २७ दिवसांनी तो ‘मन्नत’ म्हणजेच त्याच्या घरात पाऊल ठेवेल.
या ७ अटींवर आर्यनला मिळाला जामीन
आर्यन या प्रकरणातील अन्य कोणत्याही आरोपीशी संपर्क साधणार नाही.
पुराव्याशी छेडछाड करणार नाही.
आपला पासपोर्ट स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमा करा.
प्रसारमाध्यमांमध्ये भाषणबाजी करणार नाही.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही.
एनसीबीला गरज पडेल तेव्हा सहकार्य करेल.
यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, जेव्हा शाहरुख खान मला भेटायला आला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता हे अश्रू आनंदाचे आहेत. आता त्यांना दिलासा मिळाला आहे. आर्यन आता शाहरुखच्या वाढदिवशी कुटुंबासोबत असेल आणि दिवाळीही घरी साजरी करू शकेल.आर्यनच्या जामिनाची बातमी आल्यापासून शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री उशिरा काही चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजीही केली होती. आजही प्रचंड गर्दी जमण्याची शक्यता लक्षात घेऊन मन्नतच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.