सोलापूर राजमुद्रा दर्पण । चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पदोपदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते म्हणायेच खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटे बोलत आहे. त्यामुळे क्रांती रेडकर असेल किंवा मी आम्हाला बाळासाहेबांची आठवण येणे साहजिकच आहे, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आधी म्हणाले वाझे भाजपचे पोपट आहेत. नंतर हायकोर्टपण म्हणतील. कारण हायकोर्टाने जामीन दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहिलेली घटना सरकारला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करत राहावेत, असं ते म्हणाले. तसेच एका मंत्र्याच्या जावयाला 1500 कोटींचं कंत्राट मिळालं होतं. ते रद्द करावं लागलं. हे किरीट सोमय्या आणि भाजपचं यश आहे. 500 कोटी रुपये या कर्मचाऱ्यांना दिले असते तरी कर्मचारी खूश झाले असते. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांनी दिलासा देता आला असता, असा चिमटाही त्यांनी काढला.