नंदुरबार राजमुद्रा दर्पण। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे ऊस परिषद संपन्न झाली. या ऊस परिषदेत ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्रात किमान तीन हजार रुपये प्रति टन उसाला दर द्यावा. तसेच गेल्या वर्षाच्या खरेदी केलेल्या उसाला तीनशे रुपये अधिक दर द्यावे; अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
उत्तर महाराष्ट्रातून ऊस गाळपातला रस साखर न बनवता गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने जात असल्याने उसाला दर दिला जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. चोर पकडण्यात आम्हाला रस नाही; परंतु चोऱ्या संपवण्यासाठी शेतकरी संघटनेचा लढा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर व इथेनॉलचे दरही वाढले असून शेतकऱ्यांना एफआरपी द्यावीच लागेल. एफआरपी आम्ही मिळवुच. एफआरपी न देणार्यांच्या नरड्या आम्ही दाबू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांवर अन्याय
केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही जबाबदारीने एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. परंतु एफआरपीचे तुकडे करणाऱ्याचा डाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाणून पाडला आहे. देशात राजकीय टोळीयुद्ध सुरु असून आमचा लढा ४३ साखर कारखाने शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.