धुळे राजमुद्रा दर्पण | शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या चांद तारा चौकामध्ये अज्ञात इसम हा नशेच्या गोळ्या तसेच गांजा बाळगून त्यांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती दारा मार्फत आझादनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता या छाप्यात दरम्यान पोलिसांना 26 ग्रॅम गांजासह जवळपास 36 हजार 816 (कुत्ता गोळी) नशेच्या गोळ्या मिळाल्या आहेत. या सर्व मुद्दे मालाची जवळपास बाजारामध्ये 90 हजाराहून अधिकची किंमत मानली जात आहे. यासंदर्भात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
अन्न व औषध प्रशासन विभागासह आझादनगर पोलिसांनी आरोपीच्या विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आझादनगर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहून नशेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन देखील केले आहे.
जमियत ए ऊलमा या संघटनेच्यावतीने सध्या धुळे शहरामध्ये नशा मुक्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून या कारवाईची माहिती संघटनेच्यावतीने आझाद नगर पोलिसांना देण्यात आली व या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.