मुंबई राजमुद्रा दर्पण। पेट्रोल-डिझेल महागले इंधन दरवाढीपासून दिलासा नाहीच, आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ मुंबईत पेट्रोल ११४.८१ रुपये प्रतिलिटर सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल वाढ सुरुच आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. पेट्रोल तर डिझेल 33-37 पैशांनी महागला आहे. अनेक राज्यात पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केली असून, सर्वसामान्य नागरिक इंधन दरवाढीपासून त्रस्त झाला आहे.
दिल्लीत पेट्रोल १०८.९९ रुपये तर डिझेल ९७.७२ रुपयांनी मिळत आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल ११४. ८१ रुपये तर डिझेल १०५ रुपयांवर गेला आहे. तर तिकडे कोलकत्तामध्ये पेट्रोल १०९.०४ रुपये तर डिझेल १००. ८४ रुपये इतका झाला आहे. तर चेन्नई देखील पेट्रोलसाठी १०५. ०८ रुपये तर डिझेलसाठी १०१. ९२ रुपये मोजावे लागत आहे.
देशातील अनेक राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-काश्मिर आणि लडाख या राज्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर मुंबई पेट्रोलच्या किंमत सर्वाधिक आहे.