राजमुद्रा दर्पण। इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेसाठी इटलीच्या रोममध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी येथील कार्यक्रमांना हजेरी लावली. पियाझा गांधी परिसरात त्यांनी अनेक भारतीयांची भेट घेतली. या गर्दीत त्यांनी नागपूरचे महेंद्र शिरसाट ऊर्फ माही गुरुजींची भेट झाली. प्रचंड गर्दीतून चालणंही मुश्किल होत असताना मोदींनी या माही गुरुजींशी चक्क मराठीतून संवाद साधला. गेल्या २२ वर्षांपासून इटलीमध्ये भारतीय योग आणि अध्यात्माचा प्रचार-प्रसार करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी: नाव काय तुमचं?
माही गुरुजी: सर, माझं नाव माही. माही गुरुजी म्हणून ओळखतात मला. मी इथे 22 वर्षापासून राहत आहे. सर हे सगळं मी शिकवलं आहे.
मोदी: काय करता तुम्ही?
माही गुरुजी: सर, मी इथे योगा आणि संस्कृत शिकवतो.
मोदी: किती आहेत तुमचे शिष्य?
माही गुरुजी: सर, दोन लाख.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पुढील आठवड्यात ग्लासगो, स्कॉटलंड येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत भेटणार आहेत. बेनेट पंतप्रधान मोदींसह अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत, असं इस्रायल पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलच्या भेटीदरम्यान भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत भेटीचे आमंत्रण दिल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांची भेट झाली.
पंतप्रधान मोदींनी बेनेट यांना दिलेल्या निमंत्रणामुळे इस्रायलमध्ये खूप चर्चा झाली. यावरून भारताला इस्रायलच्या नव्या सरकारसोबत काम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे संकेत मिळाले. संबंध पूर्वीसारखेच राहतील.