सिंधुदुर्ग राजमुद्रा दर्पण। परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करताहेत, पगार नाही, खरे तर त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते येवढे त्यानी कमवले आहे, असे सांगत नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर हल्ला चढवला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकार्ता मेळाव्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केला. माध्यमांशी संवाद साधताना अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे म्हणाले की, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार कित्येक महिन्यांपासून त्यांना मिळाले नाहीत ही अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची आहे. गाड्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारची अवस्था गाड्यांची झाली आहे. खरे तर त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते एवढे त्यांनी कमवले आहे. सगळ्यांचे पैसे ते गोळा करतात. शिवसेनेचे कलेक्टर आहेत असे नारायण राणे म्हणाले.