जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथील जनरल ऑपरेटर या पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष शरद हरिभाऊ निंबाळकर हे दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी सेवा निवृत्त झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्लांट मॅनेजर पियूष गुजराथी, देवेंद्र पाटील, नासीर पटेल, भोवरे मॅडम, सेफ्टी ऑफिसर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
31 वर्ष 4 महिने त्यांनी कर्तव्यनिष्ठ कार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पद याची यशस्वी पणे जबाबदारी स्वीकारून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव काम केले. त्यामुळे त्यांच्या विषयी कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांच्या बद्दल आदराचे स्थान निर्माण झाले. अशी भावना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. त्यांच्या भावी वाटचालीस प्लांट मॅनेजर पियूष गुजराथी, देवेंद्र पाटील, नासीर पटेल आणि भोवरे मॅडम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.