(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोनाच्या होम टेस्टिंग किट ला मंजुरी दिली असून आता कोरोनाची तपासणी नागरिक आपापल्या घरून करू शकणार आहेत. पुणे येथील मायलॅब (Mylab) या कंपनीच्या कोरोना सेल्फ युज तपासणी किट ला ICMR ने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाची तपासणी करणे अधिक सोपे होणार असल्याने कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी न जाता कोरोनाची तपासणी करता येणार आहे.
ज्या नागरिकांना तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करणे शक्य नसते अश्या वृद्ध किंवा इतर समस्या असलेल्या नागरिकांना याचा अधीक लाभ होणार आहे.