(राजमुद्रा वृत्तसेवा)
बहुचर्चित बी.एच.आर. घोटाळा प्रकरणी मुख्य संशय येत संशयित अवसायक जितेंद्र कंडारी याचा अटकपूर्व जामीन पुणे न्यायालयात न्यायाधीश एन. एम. गोसावी यांनी काल (ता १९) फेटाळून लावल्याने जितेंद्र कंडारेला पळता भुई थोडी पडणार असल्याचे दिसून येत आहे. कंडारेच्या वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नांवर सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी पाणी फिरले आहे. त्यामुळे जितेंद्र कंडारे व सुनील झंवर यांना याचा जबरदस्त दणका बसणार असल्याची चर्चा सर्वत्र घुमत आहे.
घाला रोड पुणे येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेत जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी यांनी एकत्रित संगनमताने मोठ्या प्रमाणावर अफरातफर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यातील फरार आरोपी म्हणून घोषित सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला, माहेश्वरी हे अद्यापही सापडले नसून सुनील झंवर, जितेंद्र कंडारे यांची पोलिसांमार्फत राज्यभर शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
संशयित आरोपी जितेंद्र कंडारेने जामीन मिळण्यासंदर्भात अर्ज दाखल केल्यानंतर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाकडून आरोपी पक्षाला शाब्दिक फटकेबाजीच मिळाली होती. या अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद करत सरकारी वकिलांनी जोर देऊन हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयासमोर केली होती. त्यानुसार न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत जितेंद्र खंडारे ला संकटात टाकले आहे.