नाशिक राजमुद्रा दर्पण। इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. आता त्यांनी कोरोना लसीबद्दल एक विधान केले आहे. संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु असताना त्यांनी याविरुद्ध वक्तव्य केले आहे. मी लस घेतली नाही आणि घेणारही असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे.
या किर्तनाला 500 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. यासोबतच स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. यावेळी कोरोना लसीविषयी वक्तव्य करताना ते म्हणाले की, ‘प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी असते. यासोबतच प्रत्येक व्यक्तीची मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर लस घेऊन काय करणार…. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा.’
संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी सर्वांनी लसीकरण करावे यासाठी जनजागृती केली जात आहे. असे असताना कीर्तनकार आपल्या कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे सार्वजनिकपणे सांगत आहेत.