बंगळुरू राजमुद्रा दर्पण। हृदय विकाराचा झटका आल्याने पुनीत राजकुमार याला बंगळुरूच्या विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. हृदयविकाराच्या झटक्याने पुनीत यांचे मृत्यू झाल्यानंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या शरिराची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जातांना पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्स नुसार, कर्नाटकातील जवळजवळ सर्व हृदयरोग निदान आणि उपचार रुग्णालये तसेच तपासणी केंद्रांमध्ये लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
रोजाना सुमारे 1500 रुग्ण येत आहेत पुनीत राजकुमार याचे हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रुग्णालयात येऊन आपल्या हृदयाची तपासणी करतांना पाहायला मिळत आहे. श्री जयदेव इंस्टीट्यूटच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “मागील तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही रोज सुमारे 1000 जणांना उपचार देत आहोत, मात्र आता पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली असून, सुमारे 1500 रुग्ण दररोज येत आहेत. त्यामुळे डॉक्टर, नर्स आणि सिस्टम यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.” पुनीत राजकुमार हा दरोरज मारायचा त्या दिवशीदेखील त्याने घरी जीम मारले त्यानंतर काही मिनीटांमध्येच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे लोकांच्या मनात जीमबद्दल नकारात्मकता पसरल्याचे पाहायला मिळत आहे.